Saturday, 10 September 2016

chuk kunachi?

'चूक कुणाची ?'


देश असे देव माझा म्हणतो आपण खूप
शिव्या घालतो आपण, काढतो सिस्टीममधले लूप|
जाणतो सगळ आपण कोणाची किती भूक
भागवतो आपण ती कधी ,नाही आपली चूक?

प्रोब्लेम आहे सिस्टीमचा आपण नेहमी खरे
जे लोक आपल्या जातीचे फक्त तेवढेच बरे|
परीक्षण आपले बंद झाले,इतर निरीक्षण चालू
वर्षात दोन मिनिट फक्त ,ध्वजाला सलाम करू||

सो कॉल्ड कर्तव्य आपली आपण पूर्ण करतो ?
उपकार झाले देशावर आपण कर्तव्य तरी जाणतो|
हक्क मात्र बजावतो आपण सगळीकडे पुरते
फायदा बघून करतो देशसेवा, कर्तव्य नावापुरते||

कंटाळलो ज्या  सिस्टीमला ,झाली ती चेंज
आपलं सरकार आले तरी टीकांची तीच रेंज|
आता तरी समजून घ्या,आपण नाही योग्य
आपल्याच वर्तनावर अवलंबून आहे देशाचं भाग्य||

नाही देश योग्य,जाणतो आपण सगळे
एकत्र येऊन घडवूया देशाचे रूप वेगळे|
बंद करू वायफळ चर्चा , चुका सुधारू आधी
जागतिक पातळीवर निर्माण करू 'भारत'-सर्वोच्च उपाधी||

                                                                     - अथर्व अ. डावरे

Friday, 9 September 2016

आई

कवितेचा पहिला प्रयत्न , घासून गुळगुळीत झालेला पण तितक्याच तकाकीने चमकणारा विषय

    


स्वरांचा संगम ,'आई'चा उगम। 

सुगम होई ,वाटा त्या दुर्गम॥ 

हुद्दे हिचे अनेक,कर्तव्य मात्र चोख

या वात्साल्यासिंधूला कुटुंबाच्या आनंदाची भूक। 
आसरा दु:खी हृदयाचा,शक्तीपीठ मजबूत कण्याचे
पिल्लांच्या अलौकिक यशात सार्थक तिच्या जीण्याचे॥ 

अथांग हिचे मन ,जणू करुणेचा सागर

शब्द हिचे करतात आपल्या मनाचा जागर। 
कधी परखड कधी सौम्य,रूपं हिची अनेक
संकटसमयी धावून येतो पदर हिचा एक॥ 

प्रेम हिच्या पदरचे,अतुल्य संतोष देणारे,

हास्य हिच्या ओठाचे, दुःख वाहून नेणारे। 
स्पर्श हिच्या हाताचा ,अनादि आनंद देणारा
सहवास हिच्या मनाचा ,सदैव पुढे नेणारा॥ 

बहुरूपी आई आपुली, हिला उपमा अनेक

पण तिच्या ह्रदयाचा ठाव घेते साद आपली एक। 
प्रेरणा हि आपली,कर्म हिचे महान
देवालाही हिची उपमा, कदाचित तोही असे लहान॥ 

आईची माया व प्रेम हे कर्म खरे निष्फळ

कोडे अनंत काळापासून नाही ज्याची उकल। 
परमात्म्याचे रूप ती, करू तिची सेवा
तिच्या चेहऱ्यावरील आनंद हाच अमूल्य ठेवा
                             
                              - अथर्व अ. डावरे.