Friday, 9 September 2016

आई

कवितेचा पहिला प्रयत्न , घासून गुळगुळीत झालेला पण तितक्याच तकाकीने चमकणारा विषय

    


स्वरांचा संगम ,'आई'चा उगम। 

सुगम होई ,वाटा त्या दुर्गम॥ 

हुद्दे हिचे अनेक,कर्तव्य मात्र चोख

या वात्साल्यासिंधूला कुटुंबाच्या आनंदाची भूक। 
आसरा दु:खी हृदयाचा,शक्तीपीठ मजबूत कण्याचे
पिल्लांच्या अलौकिक यशात सार्थक तिच्या जीण्याचे॥ 

अथांग हिचे मन ,जणू करुणेचा सागर

शब्द हिचे करतात आपल्या मनाचा जागर। 
कधी परखड कधी सौम्य,रूपं हिची अनेक
संकटसमयी धावून येतो पदर हिचा एक॥ 

प्रेम हिच्या पदरचे,अतुल्य संतोष देणारे,

हास्य हिच्या ओठाचे, दुःख वाहून नेणारे। 
स्पर्श हिच्या हाताचा ,अनादि आनंद देणारा
सहवास हिच्या मनाचा ,सदैव पुढे नेणारा॥ 

बहुरूपी आई आपुली, हिला उपमा अनेक

पण तिच्या ह्रदयाचा ठाव घेते साद आपली एक। 
प्रेरणा हि आपली,कर्म हिचे महान
देवालाही हिची उपमा, कदाचित तोही असे लहान॥ 

आईची माया व प्रेम हे कर्म खरे निष्फळ

कोडे अनंत काळापासून नाही ज्याची उकल। 
परमात्म्याचे रूप ती, करू तिची सेवा
तिच्या चेहऱ्यावरील आनंद हाच अमूल्य ठेवा
                             
                              - अथर्व अ. डावरे.


2 comments:

  1. Wow thats cool bro... bec'z of ur poem i miss my mom too much...😧😢😢😢

    ReplyDelete
  2. Khaas ahe re Daware :) ekdum masta

    ReplyDelete